राजू काका आणि बंड्या (Raju Kaka Aani Bandya)

“काही व्यक्तींच्या आयुष्यात एखाद्या घटनेचा इतका प्रभाव पडला असतो, की ते सामान्य माणसा प्रमाणे जगुच शकत नाही. समाजाचाही अशा व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन फार वेगळा होऊन जातो. ही गोष्ट पण अशाच एका व्यक्तीची आहे ज्याला हा समाज एक विक्षिप्त माणुस म्हणून ओळखतो. पण सुदैवाने त्याच्या आयुष्यात एक लहान मित्र येतो आणि त्याचं आयुष्य आणि समाजाचा त्याच्याकडे बघण्याचा दृवष्टकोन बदलून जातो. कोण आहे ही व्यक्ती आणि त्याचा लहान मित्र त्याची कशी सहायता करतो, आपण ह्या गोष्टीत ऐकणार आहोत. आणि ही फक्त एक काल्पनिक कथा नाही आहे तर खरोखरच आपल्या समाजात अशे व्यक्ती असतात ज्यांना मानसिक आधाराची फार गरज असते. तर ही गोष्ट जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे लोकं अशा लोकांना समजून घेतील आणि पुढे येऊन त्यांची मदतही करु शकतील.”

All Episodes

मोहन देशपांडे नावाचा एक व्यक्ती, बदली झाल्यामुळे कोल्हापूर हुन मुंबईला शिफ्ट होतो. आपल्या शेजारच्यांशी ओळख करुन घेत असताना, एका शेजाऱ्याकडून त्यांना खूपच विचित्र आणि अप्रिय प्रतिसाद मिळतो. नेमकं काय घडतं हेच जाणण्यासाठी ऐकत रहा राजुकाका आणि बंड्यचा हा पहिला भाग.
नंदिनी आपल्या परीने, राजेश शहाणेंच्या विषयी माहिती मिळवते. पण तिला त्यांच्या विषयी जे काही थोडे फार कळतं, त्याच्यामुळे तिचं मन फार व्याकुळ होऊन जातं, आणि भूतकाळात जाऊन पोहचतं. नंदिनीला राजेश शहाणेंविषयी नेमकं काय कळतं, आणि ते ऐकून तिचं मन का दाटून येतं, हे जाणुन घ्यायला ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याचा हा दुसरा भाग.
राजेश शहाणेंविषयी ऐकून, नंदिनीला तिच्या मोठ्या भावाची आठवण होते. आणि ती त्यांची मदद करायचा विचार करते. पण त्यासाठी काय करावं, हे तिला कळत नसताना, एक व्यक्ती आशेची किरण बनुन तिच्या समोर येते. कोण असते ही व्यक्ती, हे जाणुन घेण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याच्या हा तीसरा भाग.
ह्या भागात आपण ऐकणार आहोत की, राजुकाका आवण बंड्या मध्ये मैत्रीची सुरवात होते. पण राजु काकांमध्ये अचानक हा बदल कसा होतो? हेच जाणण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याचा हा चौथा भाग.
राजेश शहाणे विषयी नंदिनीला फार सहानुभूती असते, ज्याच्यामुळे तिची मैत्रीण समृद्धी तिला काही असं बोलते, ज्यामुळे नंदिनीला आपला संताप आवरला जात नाही आणि ती समृद्धीच्या चक्क थोबाडीत मारते. नेमकं कोणत्या कारणामुळे नंदिनीचा राग ह्या थरा पर्यंत जाऊन पोहचतो, हे जाणुन घेण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याचा हा पाचवा भाग.
समृद्धीच्या बोलण्याचा नंदिनीवर फार प्रभाव पडतो आणि ती राजेश शहाणेंची मदत करण्याचा विचार सोडून द्यायचा निर्णय घेते. पण बंड्या, तिला काही समजवतो आणि तो आपला निर्णय मागे घेऊन पुन्हा सज्ज होते. बंड्या आपल्या आईला काय समजवतो, हे ऐकायला ऐकत रहा, राजुकाका आवण बंड्याचा हा सहावा भाग.
सकाळी सकाळी समृद्धीचा नवरा, राजेश शहाणेंच्या घरा समोर जाऊन जोरजोराने ओरडत असताना नंदिनी सुद्धा येते आणि समृद्धी आणि तिचा नवरा तिलाही काही फार खराब बोलतात. त्यांचा बोलणं ऐकुन राजेश शहाणेंना फार राग येतो आणि ते दार उघडून बाहेर येतात. समृद्धी आणि तिचा नवरा कशावरून राजेश शहाणेंशी भांडतात आणि ते लोक काय बोलतात, हे जाणुन घ्यायला ऐकत रहा, राजुकाका आणि बंड्याचा हा सातवा भाग.
आपल्या आणि नंदिनीच्या संबंधावर बोट उचलल्यामुळे, राजेश शहाणे फार व्यथित होऊन जातात आणि घर सोडायचा निर्णय घेतात. समृद्धीचा नवरा, राजेश शहाणेंशी इतका का चिडतो,याच्या मागचं खरा कारण काय आहे, हे ऐकायला ऐकत रहा, राजुकाका आणि बंड्याचा हा आठवा भाग.
राजेश शहाणेंच्या आयुष्यात नेमकं काय घडलेलं होतं, हे मेनका कडून नंदिनीला कळतं. बंड्या राजुकाकाना घर सोडून जाण्या पासून थांबवायचा प्रयत्न करतो, पण ते ऐकत नाही. बंड्या आणि राजु काकांमधले, मनाला हेलावून सोडणारे भावनात्मक संवाद ऐकण्यासाठी ऐकत रहा, राजुकाका आणि बंड्याचा हा नव्वा भाग.
शेवटी तेच होतं जे घडायला हवचं होतं. नंदिनी, बंड्या, मेनका आणि रखमा बाईंच्या प्रयत्नांना यश मिळतं आणि बंड्याच्या राजू काकांना त्यांचा हरवलेला मान सम्मान परत मिळतो. शिवाय लोकांचा त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टीकोन ही बदलतो. हे सगळ करत असताना, नंदिनी आणि बंड्याला एका अशा व्यक्तीची साथही मिळते, ज्याची त्यांनी कल्पना सुद्धा केली नव्हती. तर हे सगळीं कसं घडतं आणि ती व्यक्ती कोण असते हे आपण ऐकूया ह्या शेवटच्या भागात.
3 1 vote
Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Related Shows

0
Would love your thoughts, please comment.x
()
x

Connect With Us!

Join our Social Media Family