Chhatrapati Shivaji Maharaj Che Kille(छत्रपती शिवाजी महाराजाांचे किल्ले)

महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय अपूर्ण आहे आणि छत्रपती आठवले कि आठवतात महाराष्ट्रभर पसरलेले त्यांचे गडकिल्ले ! आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मोघल, पोर्तुगूज, इंग्रज ह्यांच्या विळख्यातून गनिमी काव्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड स्वराज्यात आणले, अनेकांची रचना केली, व तिथे स्वराज्याची संस्कृती रुजवली ! आज छत्रपती शिवाजी महाराज जाऊन इतके वर्ष लोटून सुद्धा हे गडकिल्ले त्यांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या विजयाची साक्ष देत गगनाला गवसणी घालून उभे आहेत ! जणू प्रत्येक गड छाती फुगवून महाराजांचा पोवाडा गातो आहे ! ह्या मालिकेच्या माध्यमातून आपण सफर करणार आहोत महाराजांच्या दहा अश्या विशेष किल्ल्यांची, जे किल्ले इतिहासात तर सोनेरी अक्षरात नमूद झाले आहेतच, मात्र आज ते पर्यटनस्थळ म्हणून देखील प्रसिद्ध आहेत !

All Episodes

तोरणा किल्ला हा पर्यटनासाठी जितका आकर्षक आहे, तितकाच मोठा आणि भव्य इतिहास ह्या किल्ल्याला लाभला आहे. स्वराज्यातील एक अत्यंत महत्वाचा किल्ला म्हणून तोरणा किल्ला ओळखला जातो.
ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने राज्य केलं तो गड म्हणजे राजगड. त्यांच्या आयुष्यातला उमेदीचा काळ त्यांनी ह्या किल्ल्यावर घालवला होता. त्यांच्या वास्तव्य देखील ह्या किल्ल्यावर दीर्घकाळ होतं असं म्हणता येईल.
महाराजांचा गौरवशाली इतिहास मिरवणारा किल्ला म्हणजे पन्हाळा ! बाजीप्रभू देशपांडे ह्यांच्या पराक्रमाने पावन झालेली ही जमीन आज इतिहासकार आणि पर्यटक दोघांनाही खुणावते आहे.
महाराजांच्या राज्यात असा एकमेव किल्ला होता जो कायम अजिंक्य राहिला ! असं काय रहस्य होतं ह्या किल्ल्याचां ज्याने ह्याला अजिंक्य बनवलं?
ऐकुया गाथा अश्या एका गडाची, ज्याने पाहिला शिवराज्याभिषेक ! मोघलांच्या सत्तेला आव्हान देणाऱ्या शिवाजी चं छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचात झालेलं रूपाांतर ! मराठा इतिहासाचा अभिमान आजही स्वतःच्या अंगाखंघांवर बाळगणारा हा गड आहे किल्ले रायगड !
“विशाल ” म्हणजे भव्य, प्रचांड, असीमित ! अगदी असंच इतिहास असणारा महाराजांच्या राज्यातला किल्ला म्हणजे “विशाळगड”!
आजही हा किल्ला स्वतःची आध्यात्मिक संपत्ती टिकवून दिमाखात विराजमान आहे, अगदी एकाघा तेजस्वी तपस्वी संतासारखा ! तो गड म्हणजे – सज्जनगड !
सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग आजही महाराजांचा गौरवशाली इतिहास बेधुंद लाटांच्या गजरात सांगत दिमाखात उभे आहेत. जाणून घेऊया ह्या दोन्ही समुद्री किल्ल्यांचा इतिहास.
“गड आला पण सिंह गेला !” ही तानाजी मालुसरे ह्यांची प्रसिद्ध गोष्ट ज्या किल्ल्याशी संबधित आहे तो किल्ला म्हणजे सिंहगड ! जाणून घेऊया त्याचा इतिहास.
शिवनेरी किल्ला म्हणजे एका तळपत्या सूर्याचा उदय ! शिवनेरी किल्ला म्हणजे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान ! ह्या मालिकेच्या ह्या शेवटच्या भागात आपण शिवछत्रपतींच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या किल्लयांची सफर पूर्ण करून रेंगाळणार आहोत शिवनेरीवर ! जिथून हि कथा खऱ्या अर्थाने सुरु झाली होती !
0 0 votes
Rating
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments

Related Shows

0
Would love your thoughts, please comment.x
()
x

Connect With Us!

Join our Social Media Family